रशियाकडून एसजे - १०० सुपर जेटची चाचणी   

मॉस्को : रशियाने एसजे १०० सुपर जेटची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा मंगळवारी केला. त्यामुळे विमान निर्मिती क्षेत्रात रशियाने मोठा पल्ला गाठल्याचे मानले जात आहे.संपूर्णत: रशियन बनावटीचे ते विमान आहे. पीडी ८ इंजिन बसवले आहे. रोस्टेक कंपनीने विमानाची चाचणी घेतली होती. स्वदेशी बनावटीचे ते प्रवासी विमान आहे. त्यामुळे आता विमानाच्या भागांसाठी पाश्चात्य देशांवर रशियाला अवलंबून राहावे लागणार नाही. युक्रेनविरोधातील युद्धामुळे २०२२ पासून अनेक निर्बंध रशियावर घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विमान निर्मिती करुन त्यांची चाचणी घेतल्याची घटना विमान क्षेत्रात महत्त्वाची ठरली आहे. अभियंत्यांनी  विमानाचे ४० भाग देशातच तयार केले. जे पूर्वी आयात केले जात होते. विमानाचे हृदय इंजिन असते. पीडी ८ इंजिनात सुधारणा केल्या. परदेशी तंत्रज्ञान अथवा एकही भाग विमान निर्मितीत वापरेला नाही. प्रथम ४० मिनिटे विमान हवेत तरंगले नंतर त्याने प्रति तास  ५०० किलोमीटर वेगाने प्रवास केला. तेव्हा त्याने  ३ हजार मीटर उंची गाठली. इंजिनाची विविध वातावरणात अभियंत्यांनी चाचणी घेतली. त्यात विमान आणि इंजिन उत्तीर्ण झाले. आता विमान उद्योगात रशिया स्वयंपूर्ण झाल्याची प्रतिक्रिया हवाई वाहतूक संस्था  रोसाव्हिएस्तियाचे मुख्य दिमिती याद्रोव्ह यांनी दिली. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विमानांचे उत्पादन केले जाणार आहे.
 

Related Articles